कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी ठाकरे सरकारने मागितली केरळकडे मदत

CM Thackeray request to kerala-govt Pinarayi Vijayan

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.राज्यात काल, रविवारी नव्या 3 हजार 41 रुग्णांची भर पडली. त्यामुळे सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 231 वर पोहोचली आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने केरळ सरकारकडे वैदकीय मदत मागितली आहे.

ही बातमी पण वाचा:- .. तर राज्य सरकारने त्याच गैरसमजात रहावे ; फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रतिउत्तर 

मुंबई, पुण्यातील कोरोना रुग्णांचा वाढती संख्या लक्षात घेता आपल्याला जास्ती जास्त प्रशिक्षित डॉक्टर्स आणि नर्सेसची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी आता राज्य सरकारने केरळला प्रशिक्षण डॉक्टर आणि नर्स पुरवण्याची विनंती केली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ टी. पी. लहाने यांनी यासंदर्भात केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांना विनंती पत्र लिहले आहे.

या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत केरळ सरकारने वैद्यकीय मदत पुरवण्याची तयारी दर्शवली आहे. मुंबईत नव्याने तयार करण्यात येत असलेल्या तात्पुरत्या हॉस्पिटलची जबाबदारी केरळचे डॉक्टर आणि परिचारिका सांभाळणार आहेत. महालक्ष्मी रेसकोर्सवरील केंद्राची जबाबदारी केरळकडे सोपवण्यात येणार आहे. रेसकोर्सवर 600 खाटांचे विशेष कोव्हिड हॉस्पिटल तयार होत आहे. तिथे तब्बल 125 खाटांचा ICU वॉर्ड असणार आहे.

केरळहून येणाऱ्या एमडी अथवा एमएस डॉक्टरांना 2 लाख, एमबीबीएस डॉक्टरांना 80 हजार आणि परिचारिकांना 30 हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER