‘आशा’ सेविका लढवय्या’ कोरोनाकाळात त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना मानाचा मुजरा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून कौतुक

CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात कोरोनाच्या (Covid-19) संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती आहे. मुलांमधील कोरोना संसर्ग आणि आशा सेविकांची जबाबदारी या विषयावर बालरोग तज्ञांच्या टास्कफोर्सच्या सदस्यांनी आशा सेविकांशी (Asha-anganwadi-sevika) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी (CM Uddhav Thackeray) संवाद साधला . ‘आशा’ सेविका लढवय्या आणि वीरांगणा आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे कोरोनाकाळात त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना मानाचा मुजरा करतो, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

आशा’ हा शब्द ज्याप्रकारे तयार झाला आहे त्याला साजेस काम आशा ताई करीत आहेत. कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. महाराष्ट्र करीत असलेल्या कामाचं देशात, परदेशात कौतुक होत आहे. त्यासाठी तुमच्या कामाचे योगदान महत्वपूर्ण आहे.

एखाद्या बहरलेल्या झाडाला घट्ट उभ करण्याचं काम त्याची जमिनीत खोलवर गेलेली मुळं करतात. त्याप्रमाणे आशाताईंचे काम असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

आशा, अंगणवाडी सेविका प्रशासनाचा पाठकणा असून स्वताची प्रकृती, कुटुंब याकडे लक्ष न देता ग्रामीण भागात आरोग्य सेवा देत आहात. त्यासाठी मी मानाचा मुजरा करतो. आशा, अंगणवाडी सेविकांच्या ज्या व्यथा, अपेक्षा आहेत त्याची योग्य ती दखल घेण्यात आली आहे. आपले ऋण विसरणार नाही. आपल्या व्यथांवर मार्ग काढला जात आहे. त्याला थोडा अवधी द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आशाताईंना केले.

महाराष्ट्राच कुटुंब आपण तळ हाताच्या फोडासारखं जपत आला आहात. तज्ञांच्या मतानुसार कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका मुलांमध्ये जाणवणार आहे. ती रोखण्यासाठी आशा ताईंची भुमिका महत्वाची आहे,असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button