थाळ्या वाजवायला सांगत नाही, तर आम्ही ‘शिवभोजन’ थाळी देतोय : मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget Session) आज तिसरा दिवस आहे. अधिवेशनात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात कलह पाहायला मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) मोर्चा हाती घेत विरोधकांच्या भाषणांचा समाचार घेतला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात राज्य सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. तसेच राज्यात सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळी योजनेवर केलेल्या टीकेला उत्तर दिले. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शिवभोजन थाळीवरून सरकारवर टीका केली होती.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात म्हटले होते की, केंद्र सरकारने कोरोना काळात ८ महिने ८० कोटी लोकांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून अतिरिक्त ५ किलो धान्य दिले. ८ महिन्यानंतर हे सर्व गरीब श्रीमंत झाले का? ते आत्मनिर्भर झाले का? त्यामुळे इंधन दरवाढ झालेली चालेले का? गरीबांना जेवण शिजवता आले पाहिजे, एवढे तरी करा.”

“सुधीरभाऊ, आम्ही पाच रुपयांत शिवभोजन थाळी देतो. पोट भरण्यासाठी भरलेली थाळी देतो. किमान गरीबांना रिकामी थाळी वाजवायला सांगत नाही.” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका केली. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात भरलेली थाळी आणि रिकामी थाळी एवढा मोठा फरक आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER