बाळासाहेब विखेंचं व्यक्तीमत्त्व मोठं – मुख्यमंत्री

CM Thackeray on Balasaheb Patil autobiography

अहमदनगर : दिवंगत नेते बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) लिखित ‘देह वेचावा कारणी या’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते पार पडत आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित झाले आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मूर्ती छोटी पण व्यक्तिमत्व मोठं हे अभावानेच दिसतं. बाळासाहेब विखेंचं व्यक्तिमत्त्व मोठं होतं. जी काही गरीबी पाहिली, ती कधी विसरली नाही. त्यांनी गरीबांची दु:खं दूर करण्याचं काम केलं आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) म्हणाले, देशात अनेक लोक खासदार होतात, काम करतात. काही काळानंतर तो प्रत्येक व्यक्ती खासदार माजी होतो. पण बाळासाहेब विखे-पाटील हे आजन्म खासदार राहिले. आजही त्यांचा उल्लेख खासदार असाच होतो. हे आत्मचरित्र नाही तर राजकारण, मानवी जीवन मूल्य, शेती आणि सिंचनाचं शिक्षण देणारा हा ग्रंथ आहे. त्यामुळे प्रत्येकाने वाचलाच पाहिजे. सर्वांना दिशा देईल अशा ग्रंथाचे प्रकाशन आज होत आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी या आत्मचरित्राचे स्वागत केले आहे.

तर, पंतपधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की,मी राधाकृष्ण विखे पाटील त्यांचा परिवार आणि अहमदनगर यांच्या सर्वांचे आभारी आहे. त्यांनी या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केले. प्रत्येक गाव, गरिब आणि शेतकऱ्यांचे जीवन सोपं बनवणे, त्यांची दु:ख, त्रास कमी करणे हे बाळासाहेब विखे पाटील यांच्या जीवनाचा मूळ मंत्र होता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

या सोहळ्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच विविध पक्षाचे मान्यवर प्रवरानगर येथे कार्यक्रमस्थळी उपस्थित आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER