अजितदादांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी ‘ती’ भाषा शिकणार: मुख्यमंत्री ठाकरे

Ajit Pawar-CM Uddhav Thackeray

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिवनेरीवर येऊन शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर भाष्य केले .

शिवाजी महाराजांना अनेक भाषा येत होत्या. त्यातली एक भाषा अजितदादांनाही येते. आता मला ती भाषा शिकायची आहे. दादांच्या मनात नेमकं काय चाललं आहे, हे कळलं पाहिजे म्हणून मी ती भाषा शिकणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगताच एकच हशा पिकला .

शिवनेरीवर आयोजित सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आदी उपस्थित होते. महाराजांना अभिवादन केल्यानंतर शिवनेरीवर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे मिश्किल भाष्य केले . शिवाजी महाराजांना अनेक भाषा यायच्या. त्यातली एक भाषा मला माझ्या सहकाऱ्यानं सांगितली. अजितदादांना ती भाषा येते. आता मला ती भाषा शिकायची आहे. दादांच्या मनात काय चाललं ते कळलं पाहिजे म्हणून मी ती भाषा शिकणार आहे, असे मिश्किल भाष्य मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER