मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींशी राजकीय तडजोडीसाठी भेट घेतली; उदयनराजेंचा आरोप

PM Modi-CM Uddhav Thackeray-Udayan Raje Bhosale

सातारा :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, जीएसटी परतावा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अशा विविध १२ विषयांवर चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हेही उपस्थित होते. या बैठकीवर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी टीका केली. ही भेट केवळ राजकीय तडजोडीसाठीच घेतल्याचे उदयनराजे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मी काही नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी गेलो नव्हतो ; उद्धव ठाकरेंचा  पत्रकार परिषदेत संताप अनावर 

“मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली. परंतु आरक्षणाआधी अधिवेशन बोलवायचे होते, चर्चा करायची, मग पंतप्रधानांना भेटायचे होते. आता भेट झाली ती राजकीय तडजोडीसाठी आहे. राज्यातले वातावरण बघता आपण एकत्र येऊ आणि लग्न पुन्हा लावून समाजाला शांत करूया, अशीच भेटीत चर्चा झाली असणार.” असा टोला उदयनराजेंनी लगावला आहे.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्राला २६ हजार ९५९ कोटी मिळणे बाकी; उद्धव ठाकरेंनी मोदींसमोर मांडला हिशेब

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button