वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत गुप्त खलबतं; परमबीर सिंह, गृहमंत्र्यांशी उद्धव ठाकरेंची 4 तास चर्चा

cm-thackeray-meet-parambir-singh-and-anil-deshmukh-over-sachin-waze-case

मुंबई :- मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याच्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. एनआयएने (NIA) पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांना अटक केली आणि अनेक गोष्टी हळूहळू उलगडू लागल्या आहेत. वाझेंना अटक झाल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यापार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर मंगळवारी रात्री उशीरापर्यंत गुप्त खलबते सुरु होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासह पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) उपस्थित होते.

या बैठकीत सचिन वाझे प्रकरणावर दीर्घकाळ चर्चा झाली. मंगळवारी रात्री साधारण आठ वाजता ही बैठक सुरु झाली. मध्यरात्री 12 च्या सुमारास ही बैठक आटोपून मंत्री आणि पोलीस अधिकारी वर्षा बंगल्यावरुन परतले. त्यामुळे आता या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

अंबानी स्फोटक प्रकरणात ‘एनआयए’कडून सुरु असणारा तपास आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. या सगळ्या कटाची सूत्रे मुंबई पोलीस दलातील एका IPS अधिकाऱ्याने हलवल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे आता ‘एनआयए’कडून या वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी ‘एनआयए’ने गृहमंत्रालयाकडे परवानगी मागितल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER