मुख्यमंत्री ठाकरे धर्मनिरपेक्षतेबद्दलची भूमिका लपवत आहेत : शेलारांचा आरोप

Ashish Shelar & Uddhav Thackeray

मुंबई : मंदिरं उघडी करण्याच्या मागणीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मंगळवारी खरमरीत पत्र लिहले होते. त्यानंतर या पत्राला मुख्यमंत्र्यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. यावरून राजकीय कलगीतुरा रंगला असताना राज्यपालांच्या पत्राबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र पाठवलं आहे. तर राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रात काहीच वावगं नसल्याचा दावा भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे.

राज्यपालांच्या पत्रातील भाषा पूर्णपणे सांविधानिक आहे. तसंच कुणाचाही अवमान करणारी नसल्याचं आशिष शेलार यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रातील भाषेवर मात्र शेलार यांनी आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धर्मनिरपेक्षतेबद्दलची आपली भूमिका लपवत असल्याचा आरोपही शेलार यांनी केला आहे. पवारांच्या पत्रावर आपण भाष्य करणार नाही, आपण तेवढे मोठे नसल्याची प्रतिक्रिया शेलार यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER