मुख्यमंत्री महापालिकेच्या कंट्रोल रुममध्ये दाखल; विविध भागांची केली पाहणी

CM Uddhav Thackeray-MUMBAI RAIN

मुंबई : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईत सकाळपासून पावसाने (Mumbai Rain) हजेरी लावली आहे. आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सोबतच रेड अ‍ॅलर्ट (Red Alert) राजी करण्यात आला आहे. तसेच पुढील ४ दिवस ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) महापालिकेच्या (BMC) आपत्कालीन कक्षात पोहोचले आहेत. त्यांनी पालिका अधिकाऱ्यांकडून आढावा घेत आहेत. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना अ‍ॅलर्ट राहण्याच्या सूचनाही दिल्या.

मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे सखल भागात पाणी तुंबले असून वाहतुकीची कोंडी झाली आहे. हिंदमाता येथे अडीच फुट पाणी साचले आहे. तसेच सायन आणि चुनाभट्टी येथे रेल्वेरुळावर पाणी भरल्याने लोकल ठप्प झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button