लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री आग्रही; सत्तेत असलेल्या काँग्रेस नेत्यांमध्ये दुमत

मुंबई :- राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन लावला जावा, अशी आग्रही भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घेतली आहे. राज्यात लॉकडाऊन (Corona Lockdown) लावला जावा का? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांचे मत जाणून घेण्यासाठी बैठक घेत आहे. यावेळी काँग्रेस (Congress) पक्षाची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख सहभागी झाले.

राज्यातील आजच्या स्थितीत लोकांचा जीव वाचवण्याला प्राथमिकता दिली पाहिजे, असं मत नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केलं. हातावर पोट असणाऱ्यांचा विचार करावा लागेल. मृत्यू थांबवण्यासाठी सर्वोत्तम उपाय करा. वेळप्रसंगी कटू निर्णय घ्यावे लागले तरी तो स्वीकारायला हवा, असंही पटोले यांनी म्हटलं. तर राज्यात आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊन किंवा कठोर निर्बंध लावायचे असतील तर गरिबांचं नुकसान होणार नाही, अशी व्यवस्था करावी लागेल. पूर्ण लॉकडाऊन नको आणि सर्व सुरूही नको, मध्यबिंदू काढा, अशी मागणी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केली. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊनबाबत काँग्रेस नेत्यांमध्येच दुमत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button