मुख्यमंत्र्यांनाच आरक्षण द्यायचे नाही; नारायण राणेंचा गंभीर आरोप

narayan rane and uddhav thackeray

पुणे : सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. याच मुद्द्यावरून भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच आरक्षण द्यायचे नाही. शिवसेनेचा आरक्षणाला विरोध आहे, असा थेट आरोप नारायण राणे यांनी केला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठा आरक्षणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) ज्या मुद्द्यांवर आरक्षण दिलं होतं ते मुद्दे मांडायला वकील कमी पडले. मराठा आरक्षणाबाबत सरकारला मदत करण्यासाठी भाजपने नेमलेले पाच वकील मदत करतील, असा प्रस्ताव राज्य सरकारला देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राणे म्हणाले, शिवसेनेची आरक्षणाबाबत असलेली भूमिका मला माहीत आहे. ते आरक्षणाच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांनी चांगली यंत्रणा दिली नाही. ते निकष सुप्रीम कोर्टात मांडण्यात आले नाहीत. दुर्लक्ष केल्याने कोर्टाने आरक्षण नाकारले आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारप्रमाणे रिव्ह्यू पीटिशन दाखल करावे, अशी आमची भूमिका आहे. अनेक राज्यांत आरक्षण सुरू आहे. मग आमचेच रद्द का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राष्ट्रपती नियुक्त भाजप खासदार संभाजीराजेंवर नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज घणाघाती टीका केली. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी पंतप्रधानांवर परत टीका केली तर आम्ही वाजवून टाकू, असा थेट इशारादेखील त्यांनी दिला.

संभाजीराजेंच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर बोलताना आणि आंदोलनाबाबत विचारल्यावर ते सिंधुदुर्ग दौऱ्यावर आल्याचे माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. संभाजीराजे यांना, म्हणून कोणी पुढारी बनत नाही. रायगडावर कोण आहेत आंदोलन करायला? असा सवालदेखील त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांचा अभ्यास कुठे आहे हो? ते साधा एक प्रस्ताव वाचू शकत नाहीत. तेवढा वेळ मिळाला नाही. ते उद्गार काढतात का? मी इतकी वर्षे त्यांच्याबरोबर होतो. ते कधी उद्गार काढताना दिसले नाहीत, असेही राणे म्हणाले. यासोबतच त्यांनी कोरोना परिस्थितीवरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत. आणि सगळं केंद्रानं द्यावं, अशी मागणी करत असतात. लस मिळाली नाही त्याला दोघे जबाबदार. पण राज्य सरकारने प्रयत्न करायला हवे. ग्लोबल टेंडर काढले. आणि त्याला १२ टक्के मागितले. त्यानंतर टेंडर रद्द झाले, असा आरोपही त्यांनी केला.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. शरद पवार यांच्या आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे या भूमिकेविषयी बोलताना राणे म्हणाले, पवारांच्या भूमिकेबाबत मला काही म्हणायचे नाही. त्यांनी मराठा समाजाच्या बाजूने बोलावे. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. हा मुद्दा आलाच नाही. यावरूनच कळते, असे म्हणत त्यांनी पवारांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

यावेळी राणे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर टीका केली. नाना पटोले यांना तोडफोड करायची, काड्या करायची सवय झाली आहे. ते पक्ष जोडणार नाहीत तर तोडणारे आहेत. परत टीका केली तर नाना आम्ही वाजवून टाकू…भजन, असं राणे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button