प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्र्याचा फोन, मात्र पंढरपुरात आंदोलन होणारच

सोलापूर : पंढरपूर (Pandharpur) येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे मंदिर भाविकांसाठी खुले करावे, या मागणीसाठी विश्व वारकरी सेना, बहुजन वंचित आघाडीकडून आज पंढरपुरात आंदोलन करण्यात येत आहे. वंचित आजघडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे स्वतः आंदोलनाचे नेतृत्व करत असल्याने पंढरपुरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. दरम्यान, आंदोलन न करता चर्चा करावी, यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (CM Uddhav Thackeray) यांनी फोन केल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. मात्र आपण आंदोलनावर ठाम असल्याचे सांगत आंबेडकर सोलापूरहून पंढरपूरकडे रवाना झाले आहे.

ही बातमी पण वाचा:- प्रकाश आंबेडकरांच्या मंदिर प्रवेशाच्या इशाऱ्यानंतर पंढरपुरात पोलीस बंदोबस्त कडक

पंढरपूरकडे रवाना होण्यापूर्वी आंबेडकर यांनी याबाबतची माहिती दिली. मुख्यमंत्र्यानी मला फोन केला. चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याची विनंती त्यांनी केली. मात्र त्यांच्यात आणि आमच्या मागण्यांमध्ये विसंगती आहेत. आमची एकच मागणी असल्याचे त्यांना सांगितले. मात्र त्यांनी कुठलेही ठोस आश्वासन दिले नसल्याने आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर ११ वाजेपर्यंत पंढरपूर मध्ये पोहोचणार आहे. पोलिसांच्या नाकेबंदीमुळे मोजके वारकरी व वंचित कार्यकर्ते पंढरपुरात पोहोचू शकले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी मोजक्या वारकाऱ्यांसह नामदेव पायरी जवळ भजन करण्यास परवानगी द्यावी किंवा मोजक्या आंदोलकांसह विठ्ठल मंदिरात दर्शनाची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश आंबेडकर यांना मोजक्या वारकऱ्यांसह श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सोडले जाण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER