अतिवृष्टीग्रस्तांसाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा, 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्यासाठी ठाकरे सरकारने (Thackeray govt) मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अतिवृष्टीग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीने वितरित करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. तसेच राज्याचे केंद्राकडे ३८ हजार कोटी थकीत असून केंद्राने अजूनही ही रक्कम दिली नसल्याचं स्पष्ट केल आहे.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदतीबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अनिल परब उपस्थित होते.

साधारणपणे ऑक्टोबर 2019 पासून आतापर्यंत शेतकऱ्यांना 30 हजार 800 कोटी रुपये दिले. यात कर्जमुक्तीचाही समावेश आहे. ९ हजार ८०० कोटी विविध नैसर्गिक आपत्तींसाठी दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्याचं केंद्राकडून जवळपास ३८ हजार कोटी रुपये एकूण येणं बाकी आहे. त्यात निसर्ग चक्रीवादळ – १ हजार ६५ कोटी रुपये बाकी, पूर्व विदर्भात पूर – ८०० कोटी रुपये बाकी आहेत. याचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. पण पैसे आलेले नाहीत. ऑगस्टपासून अतिवृष्टी सुरु पण केंद्राकडून पाहणीसाठी पथक आलेलं नाही. राज्यात संकटांची मालिका सुरुच आहे. राज्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपये देण्याची राज्याची घोषणा केली आहे. पिकं, रस्ते, वीजेचे खांब, खरडून गेलेली जमीन अशा सगळ्यांसाठी ही मदत आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करु. सध्या परिस्थिती कठीण, राज्याकडेही पैसा नाही. पण अशा स्थितीतही राज्य शेतकऱ्यांना मदत करत आहे. केंद्राच्या नियमानुसार बागायती आणि कोरडवाहूसाठी ६ हजार ८०० रुपये दिले जाऊ शकतात. पण आम्ही हेक्टरी १० हजार रुपये मदत देणार आहोत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तर फळबागांसाठी १८ हजार प्रति हेक्टर ही केंद्राच्या नियमानुसार, पण राज्य सरकार २५ हजार प्रति हेक्टर मदत करणार, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER