राज ठाकरेंची मागणी मुख्यमंत्र्यांकडून तत्त्वतः मंजूर; पुढेही पाठपुरावा करण्याचे आश्वासन

Raj Thackeray-CM Uddhav Thackeray

मुंबई :- कोरोनाचा (Corona Crises) प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाकरे सरकारने राज्यभरात लॉकडाऊनचे (Corona Lockdown)  कडक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे राज्यात कुठल्याही प्रकारच्या चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काल दुपारी मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. या चर्चेनंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. इतर राज्यांमध्ये टीव्ही मालिकांचं चित्रीकरण सुरू आहे. पण महाराष्ट्रात बंदी असल्याने अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे राज्यात चित्रीकरण पुन्हा सुरू होणं गरजेचं  झालं आहे, असं मत राज यांनी मांडलं. त्यानंतर मालिका निर्माते आणि वाहिन्यांचे प्रमुख यांनी कडक निर्बंध पाळून, बायो बबलमध्ये चित्रीकरण कसं करणार यासंदर्भातला प्रस्ताव दिल्यास त्यांना मंजुरी देता येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनाची माहिती राज ठाकरे यांनी दिली. बायो बबल नेमका कसा असेल, कलाकार-तंत्रज्ञ यांची संख्या नेमकी किती असेल, सरकारने आखून दिलेल्या नियमांची कशी अंमलबजावणी होणार, चित्रीकरणाची जागा कोणती असेल, कलाकार-तंत्रज्ञ यांची राहण्याची व्यवस्था काय असेल अशा सर्व बाबी नमूद असलेला प्रस्ताव जर प्रत्येक निर्मात्याने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेकडे सादर केला तर त्यापुढील मंजुरीसाठी कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले. आज झालेल्या ‘झूम’ संवादात निर्माते आणि टीव्ही चॅनल प्रमुख यांच्याशी राज ठाकरे यांनी आज चर्चा केली. गेले अनेक दिवस प्रलंबित असलेल्या या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी त्वरित तोडगा काढल्याबद्दल ‘झूम’ चर्चेत उपस्थित सर्वांनीच त्यांचे आणि प्रयत्नांचे मनसेने  आभार मानले.

दरम्यान, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकच्या आसपासच्या परिसरातच चित्रीकरणासाठी परवानगी मिळू शकेल, राज्यातील इतर भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी लगेचच चित्रीकरणासाठी परवानगी मिळणं कठीण आहे, असंही राज ठाकरे यांनी या बैठकीत स्पष्ट केलं. मनोरंजन क्षेत्राला सध्या भेडसावणाऱ्या इतर गंभीर प्रश्नांबाबत सरकारी यंत्रणेसोबत पाठपुरावा सुरू राहील, असे आश्वासनही राज ठाकरे यांनी दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button