अभिमानास्पद ! दोन कोटी लसीकरण करणारा महाराष्ट्र देशात अव्वल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आरोग्य यंत्रणेचे कौतुक

मुंबई :- राज्यात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. महाराष्ट्राची रुग्णसंख्या ही देशात सर्वांत जास्त होती. महाराष्ट्रात (Maharashtra) दररोज ६० हजारांवर रुग्ण सापडत होते. त्यानंतर राज्य सरकारने लसीकरणावर भर देण्याचा प्रयत्न केला. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी जनतेला लसीकरण करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता महाराष्ट्रात दोन कोटी लसीकरणाचा (Corona Vaccinations) टप्पा पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र हे लसीकरणाचा दोन कोटी विक्रमी टप्पा गाठणारे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. ही देशातली अव्वल कामगिरी असून या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आरोग्य यंत्रणेचं अभिनंदन केलं आहे. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र अव्वल आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीदेखील आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले आहे.

ही बातमी पण वाचा : तौक्ते चक्रीवादळ ; धोका कमी झाला असला तरी मदतकार्य वेगाने सुरू ठेवा ;  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button