१ जूननंतर लॉकडाऊन वाढणार का? मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर…

CM Uddhav Thackeray

मुंबई :- कोरोनाला (Corona Virus) नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्रात ठाकरे सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. आधी सरकारने १५ मेपर्यंत लॉकडाऊन (Corona Lockdown) जाहीर केला होता, त्यानंतर १ जूनपर्यंत वाढ करण्यात आला. तसेच सरकारने निर्बंधदेखील कठोर केले आहेत. कोरोनाची दुसरी लाट काहीशी आटोक्यात येत असताना आता ‘Black Fungus’ म्हणजेच काळ्या बुरशीचे संकट महाराष्ट्रावर ओढवले आहे. लसींचा तुटवडा आणि तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी पुढची तयारी करणे आवश्यक आहे. यावरून लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरी (Ratnagiri) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना लॉकडाऊनसंबंधी महत्त्वाचे विधान केले आहे.

ही बातमी पण वाचा :- गुजरातप्रमाणे पंतप्रधान मोदी महाराष्ट्रालाही मदत देतील  ;  उद्धव ठाकरेंना विश्वास 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना महाराष्ट्रातील कोरोना स्थितीबद्दल विचारण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, “कोरोना कमी होतोय हे नक्कीच… पण त्यासंबंधी काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्या वेळी आपण अनुभव घेतला आहे. आपण कोरोनावर नियंत्रण मिळवले होते. पण थोडीशी शिथिलता आली आणि कोविड चौपटीने वाढला.” “कोरोनाची दुसरी लाट ही फार घातक आहे, अत्यंत वेगाने पसरतो. गेल्या वेळच्या तुलनेत आताची परिस्थिती वाईट आहे. मागील अनुभवावरून यावेळी समजदारीने काम करावे लागणार आहे. निर्बंध शिथिल करताना मागील अनुभव लक्षात ठेवावे लागणार आहे. सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील. ” असेही उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, लॉकडाऊन वाढणार का, असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, “सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार निर्णय घेऊ, पण कोणीही गाफील राहू नये.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button