मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि फडणवीस आज उस्मानाबादमध्ये, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

मुंबई: परतीच्या पावसाने शेतक-यांचे अतोनात हाल केले आहे. हाती आलेले पिक पाण्यात गेले. शेतक-यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील नेते बांधावर पाहणी करण्यासाठी निघाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज उस्मानाबाद पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

त्यानंतर तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे दुपारी १:३० वाजता पत्रकार परिषद होणार आहे.

तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसदेखील (Devendra Fadnavis) आज उस्मानाबादमध्ये असतील. त्यांच्याही दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहेत आज ते उस्मानाबाद आणि लातूर दौ-यावर आहेत.

देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीग्रस्त भागांचा आढावा घेणार तसेच, पिकांच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER