निर्णय घेण्यास मुख्यमंत्री समर्थ, ते कोणाच्याही दबावात येणारे नाहीत- संजय राऊत

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात (Pooja Chavan Sucide case) वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे राजीनामा देणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. कारण शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक ट्विट करत तसे संकेत दिले आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) विरोधकांच्या दबावापुढे राठोडांचा राजीनामा घेतील, अशी चर्चा सुरू आहे.

मात्र संजय राऊत यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मुख्यमंत्री कोणाच्याही दबावात नाही, निर्णय घेण्यास एकटेच समर्थ आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणाच्याही दबावाला बळी पडत नाहीत. माझी मुख्यमंत्र्यांशी रोजच चर्चा होत आहे. त्यांना कोणत्याही ट्विटची गरज नाही. माझं ट्विट सर्वसमावेशक आहे. व्यापक आहे. मुख्यमंत्री माझे मित्र आहेत.

मार्गदर्शक आहेत. संजय राठोड यांच्या चौकशीसाठी गृह खातं आहे. चौकशी करणारे अधिकारी आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. दरम्यान, “महाराजांच्या हातातील राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन” असं लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच ट्विट केला आहे. थोडक्यात मुख्यमंत्र्यांच्यावतीने राऊत यांनी ट्विट करत राठोड यांना एकप्रकारे इशारा दिल्याचं बोललं जातं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER