भास्कर जाधव यांच्या नाराजीची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल?

bhaskar jadhav -cm thackeray

रत्नागिरी/ प्रतिनिधी : गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या नाराजी नाट्याच्या व्हायरल झालेल्या ‘त्या’ व्हिडिओची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून यासंदर्भात त्यांनी भास्कर जाधव यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

आम्ही १५ कोटी, पण १०० कोटींना भारी, ‘एआयएमआयएम’ नेत्याचे बेताल वक्तव्य

कोकणच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात व्यसपीठीय कार्यक्रमात खासदार विनायक राऊत यांनी सत्कारासाठी जवळ बोलावण्यासाठी पुढे केलेला हात भास्कर जाधव यांनी झटकून टाकला होता. सुरुवातीला ते व्यासपीठावरदेखील मागच्या खुर्चीत बसले होते. त्यांची नाराजी कार्यक्रमात लपून राहिली नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

भास्कर जाधव यांना शिवसेनेत प्रवेश देतेवेळी त्यांना दिलेले मंत्रिपदाचे आश्वासन पाळले न गेल्यामुळे त्यांची ही नाराजी होती. ही बातमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचताच त्यांनी भास्कर जाधव यांना दूरध्वनी करून त्यांच्याशी संवाद साधला असल्याचे समजते. सद्यस्थितीत शिवसेनेत दुफळी माजलेली असताना आणखी एक आमदार गमावणे शिवसेनेला परवडणारे नाही. त्यामुळे जाधव यांची नाराजी दूर केली जाण्याची अपेक्षा आहे.