निवृत्त अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीला मुख्यमंत्र्यांचे समर्थन? – नवनीत राणा

Uddhav thackeray & Navneet Rana

नवी दिल्ली : “माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) यांनी एकही शब्द न बोलणं म्हणजे त्या हल्ल्याचं समर्थन आहे, अशी टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. त्यातच आज संसदेच्या अधिवेशनात त्यांनी हा मुद्दा उचलत संवेदनाहीन मुख्यमंत्री याबाबत दिलगिरी सुद्धा व्यक्त करत नाहीत. हा संपूर्ण देशातील माजी सैनिकांचा अपमान आहे. असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

आजच्या अधिवेशनात बोलताना त्यांनी खासदारांच्या विकास निधीवरूनही भाष्य केले. खासदारांचे वेतन घ्या, पण खासदार निधी कापू नका, अशी विनंती नवनीत राणा यांनी लोकसभेत बोलताना केली. कृपया आमचे (खासदारांचे) पगार घ्या, पण कृपा करुन मतदारसंघाच्या विकासासाठी दिला जाणाऱ्या निधीत कपात करु नका, अशी विनंती नवनीत कौर राणा यांनी केली. लोकसभेने संसदेच्या सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन (दुरुस्ती) विधेयक 2020 मंजूर केले. यावरील चर्चेदरम्यान नवनीत राणा यांनी मागणी केली. यानुसार खासदारांचे 30 टक्के वेतन पुढील वर्षभरासाठी कापले जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER