मुख्यमंत्र्यांनी मी ६ जूनला भूमिका घेण्यापूर्वी समाजाचे ५ प्रश्न मार्गी लावावेत – खासदार संभाजीराजे छत्रपती

खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आज सिंधुदुर्ग दौरा केला. यावेळी बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणालेत कि, मुख्यमंत्र्यांनी (CM Uddhav Thackeray) मला सल्ला दिला असेल परंतु त्यांना हे देखील माहिती आहे कि ५ मे ला सर्वोच्च न्यायालयाचा मराठा समाजाच्या विरोधात जो निकाल आला त्यावेळीच महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना शांत राहण्याचे आवाहन मी केले त्यामुळे मराठा बांधवांच्या भावनांचा उद्रेक झाला नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांनी कौतुकही केलं होतं. आज त्यांनी सल्ला दिला की मी कोरोनाचा योद्धा होऊन बाहेर पडावं, पण मी सुरुवातीपासूनच समाजाचा योद्धा आहे.

ही बातमी पण वाचा:- पंतप्रधान मोदींवर नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही, संभाजीराजेंचे स्पष्टीकरण

कोरोनाचा योद्धा बनून मी बाहेर पडाव असं जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर समाजाचे पाच प्रश्न मी मांडले आहेत. ते त्यांनी ६ जूनला मी भूमिका घेण्यापूर्वी मार्गी लावावेत असेही खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी म्हटले आहे. तर मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे देखील या प्रश्नातून मार्ग काढतील असा विश्वास आहे असेही ते यावेळी म्हणाले. समाजाला न्याय देण्याची भूमिका या सरकारने घ्यावी मराठा समाजाच्या प्रश्नामध्ये राजकारण आणू नये अशी माझी प्रामाणिक भूमिका असल्याचेही यावेळी संभाजी राजे छत्रपती म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button