पूरग्रस्त भागांचा दौरा करून मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर करावी – प्रकाश आंबेडकर

Prakash-Ambedkar-Uddhav-Thackeray

पुणे :- परतीच्या पावसामुळे राज्यात अनेक भागांत नदीनाल्यांना पूर आले आहेत. शेतीचे आणि संपत्तीचे नुकसान झाले आहे. अनेक नागरिक, जनावरांचा मृत्यू झाला. म्हणून मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करावा आणि पूरग्रस्तांना मदत जाहीर करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे. सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. सोंगणीवर आलेल्या पिकांची नासाडी झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करावा. त्यामुळे लोकांना दिलासा मिळेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणालेत. पाऊस आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या हिरावला आहे. कर्जबाजारी असलेला शेतकरी हताश झाला असून सरकारच्या मदतीची वाट पाहतो आहे. शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरस्थिती असलेल्या भागाचा दौरा करणे आवश्यक आहे. डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीमबरोबर बैठक करून त्वरित मदत घोषित करण्याची गरज आहे. अशी मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER