शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार

CM Thackeray-Sharad Pawar

मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात (agricultural law) राजधानी दिल्लीच्या वेशीवर मागील 52 दिवसांपासून शेतकऱ्याचे आंदोलन सुरु आहे. आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये आतापर्यंत चर्चेच्या 9 फेऱ्या झाल्या आहेत. मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. कारण येत्या आठवड्यात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) रस्त्यावर उतरुन कृषी कायद्याचा विरोध करणार आहेत, अशी माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री आणि राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध येत्या आठवड्यात स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार आहेत. केंद्राच्या तिनही कृषी कायद्याविरोधात देशातील सर्व विरोधीपक्ष एकत्र आले आहेत. तिनही कायद्यांना सर्वोच्च न्यायालयानं सध्या स्थगिती दिली आहे. लोकशाहीत सरकारला कायदे रद्द करण्याचा अधिकार आहे. आज ना उद्या केंद्र सरकारला हे कृषी कायदेरद्द करावेच लागतील, असा दावा नवाब मलिक यांनी केला.

ही बातमी पण वाचा :राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना मंत्रिपद? शरद पवारांशी बोलण्याचे सुप्रिया सुळेंचे आश्वासन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER