मुख्यमंत्री म्हणाले, आधी मी पाणी पितो नंतर काँग्रेसला पाजतो

DEVENDRA-FADANVIS1

नांदेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाहिर सभांमध्ये आक्रमक भाषण करत आहेत. नांदेड येथील एका सभेत मुख्यमंत्र्यांना तहान लागली असता त्यांनी पाणी मागविले. नंतर थोडे थांबत म्हणाले, आधी मी पाणी पितो नंतर काँग्रेसला पाणी पाजतो, असे म्हणत काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या विरोधात घेतलेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

राहुल गांधींचे आजोबा चांगले व्यक्ती होते, त्यांच्यापासून गरिबी हटाव चा नारा सुरू झाला जो अजून आहे. मोदींनी काळा पैसा तिजोरीत आणला आणि हे काँग्रेसवाले त्याच्या भरवशावर 72 हजार ची योजना सांगत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. अशोक चव्हाणांना आव्हान देत आहे. मागील 15 वर्षात तुम्ही नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 350 कोटी दिले आणि आमच्या सरकारने 2 हजार 226 कोटी दिले आहेत.

पाकिस्तान हा कत्र्याच्या शेपटी सारखा आहे वाकडा तो वाकडाच. त्याला खबरदार एवढे म्हणण्याची हिंम्मत, धमक काँग्रेसमध्ये नव्हती. अमेरिका आणि इस्रायल हे 2 देश जगात असे होते जे त्यांच्या सैन्यावरील हल्ला कोणत्याही स्थितीत खपून घ्यायचे नाहीत. आता या रांगेत तिसरा देश आलाय तो आपला भारत देश आहे.
ही निवडणूक फक्त विकास आणि गरिबी एव्हढ्यापुर्ती मर्यादित नसून राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक असल्याचे सांगताना मुख्यमंत्री काँग्रेस वाले म्हणजे धादांत खोटारडे, राहुल गांधी यांचे भाषण म्हणजे केवळ मनोरंजन.