पवारांच्या नाराजीनंतर मुख्यमंत्र्यांची सावरासावर; म्हणाले, तो ‘निर्णय’ माझा नाहीच

Sharad Pawar - CM Uddhav Thackeray

मुंबई : एल्गार परिषदेनंतर उसळलेल्या कोरेगाव भीमा दंगलीचा तपास एनआयएकडे देण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांची ही नाराजी महाविकास आघाडी सरकारसाठी घातक ठरू शकते याची प्रचिती आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घूमजाव केले आहे.

केंद्र सरकारने राज्याच्या तपास यंत्रणेवर अविश्वास व्यक्त करणं योग्य नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, एल्गार परिषदेचा तपास एएनआयकडे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला नाही, तो केंद्राने अविश्वास दाखवत घेतला, त्याबाबत आमची नाराजी कायम आहे. मात्र या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण गाजत असताना मुख्यमंत्र्यांनी बदलेल्या भूमिकेची चर्चा होऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी कोकणात झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हे दोन वेगळे विषय आहेत.

मोदींनी केलेल्या कामांची पाहणी ट्रम्प कधी करणार? – शिवसेनेचा मोदी सरकारला टोला

एल्गारचा तपास केंद्राने काढून घेतला आहे. परंतु कोरेगाव भीमाचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही आणि देणारही नाही, असे मत मांडले होते. दरम्यान, एल्गार परिषदेनंतर झालेल्या भीमा कोरेगाव दंगलीच्या तपासाबाबत मागील सरकारच्या गृह खात्यातील अधिकाऱ्यांची बाजू आक्षेपार्ह, चुकीची होती अशा तक्रारी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून आल्या होत्या. ज्यांची वागणूक आक्षेपार्ह आहे, त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्याची प्रक्रिया येथून सुरू झाली होती. कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा अधिकार असून तो काढून घेणे योग्य नाही. केंद्राने तो काढून घेतला म्हणून त्याला पाठिंबा देणेही अधिक योग्य नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय अयोग्य आहे अशी जाहीर नाराजी शरद पवारांनी व्यक्त केली होती.