मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज जळगाव जिल्ह्यात दाखल होणार

CM Fadnavis

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज जळगाव जिल्ह्यात दाखल होत आहे. आज त्यांच्या जळगाव, भुसावळसह व जामनेर अशा तीन ठिकाणी जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहे. ही यात्रा आज सकाळी ११.३० वाजता अमळनेर येथे व दुपारी १२.३० वाजता धरणगाव येथे पोहचेल. या दोन्ही ठिकाणी यात्रेचे स्वागत होईल. यानंतर ही यात्रा जळगाव येथे पोहचणार आहे.

ही बातमी पण वाचा:- महाजनादेश यात्रा : दुसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांचे खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यात शक्तिप्रदर्शन

जळगावात दुपारी दीड वाजता जाहीर सभा होईल. दुपारी ३ वाजता भुसावळ येथे तर सायंकाळी ५ वाजता जामनेर येथे जाहीर सभा होईल. यानंतर ही यात्रा पुन्हा भुसावळात येईल आणि तिथे मुक्काम असेल. शनिवार २४ रोजी सकाळी ११ वाजता बोदवड येथे स्वागत होऊन यात्रा मलकापूरकडे मार्गस्थ होणार आहे.