ती आमची मुलगी आहे ; कंगणाला हिमाचल प्रदेश सरकारकडून सुरक्षा

Jayaram Thakur on Kangana ranaut

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana ranaut) मुंबईची (Mumbai) तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. सर्वच स्तरांमधून कंगनावर टीकास्त्र डागण्यात येत आहे. त्यामुळेच कंगनाला सुरक्षा मिळावी, अशी विनंती तिच्या कुटुंबीयांनी हिमाचल प्रदेश (himachal-pradesh) सरकारकडे केली होती.

हिमाचल प्रदेश सरकारकडून कंगनाला सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Jayaram Thakur) यांनी कंगनाला पूर्णपणे सुरक्षा देण्याचं आश्वासन दिले आहे.

“कंगनाच्या कुटुंबीयांसोबत माझा फोनवर संवाद झाला असून हिमाचल सरकार कंगनाला पूर्ण सुरक्षा देईल. तसंच हिमाचल प्रदेशच्या पोलीस महासंचालकांनादेखील तसे आदेश देण्यात आले आहेत. ९ सप्टेंबर रोजी कंगना मुंबईत जाणार असून हिमाचलच्या मुलीला सुरक्षा देणे यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत”, असे जयराम ठाकूर यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER