मुख्यमंत्र्यांकडून काँग्रेसला खो; विश्वासू शिलेदाराला सोपवले यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रिपद

CM Uddhav Thackeray - Sandeepan Bhumare

यवतमाळ :- पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्याप्रकरणी तत्कालीन वनमंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मोठा निर्णय घेत आपल्या विश्वासू शिलेदाराकडे ही जबाबदारी सोपवली आहे. रोहयो, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे (Sandeepan Bhumare) यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोपवले आहे. या निमित्ताने पालकमंत्रिपद पुन्हा शिवसेनेकडे कायम राहिले.

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर नव्या पालकमंत्र्यांचा शोध सुरू होता. एकनाथ शिंदे, अनिल परब, शंभूराजे देसाई अशी काही नावे  चर्चेत होती.  त्यासाठी जिल्ह्यातील शिवसेना (Shiv Sena) नेत्यांकडून लॉबिंग पण सुरू होते. त्याच वेळी काँग्रेसनेसुद्धा यवतमाळचे पालकमंत्रिपद अमरावतीच्या यशोमती ठाकूर यांना दिले जावे यासाठी प्रयत्न सुरू केले होते. १ मे महाराष्ट्रदिनापूर्वी पालकमंत्री घोषित होईल, असे सांगितले जात होते. अखेर आज त्याचा मुहूर्त सापडला. औरंगाबाद येथील शिवसेना नेते आणि मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button