मुख्यमंत्र्यांकडून हिंगणघाट पीडितेच्या कुटुंबाला दिलेल्या वचनाची पूर्तता

Hinganghat Case - CM Uddhav Thackeray

नागपूर :- काही दिवसांपूर्वी हिंगणघाट येथे घडलेल्या जळीतकांड प्रकरणात दुर्दैवी मृत्यू पावलेल्या पीडित तरुणीच्या कुटुंबाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या वाचनाची पूर्तता केली आहे. हिंगणघाटच्या श्रीमती कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतिशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक असलेल्या तरुणीला एका माथेफिरूने एकतर्फी प्रेमातून पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. ३ फेब्रुवारी रोजी हा धक्कादाय प्रकार घडल्यानंतर संपूर्ण राज्यासह देशभरातून संताप व्यक्त केला गेला होता. या तरुणीची मृत्यूशी झुंज १० फेब्रुवारी रोजी संपली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यानच्या काळात या मुलीच्या उपचारावरील सर्व खर्च राज्य सरकार करेल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. हाच शब्द त्यांनी पूर्ण केला आहे.

अजित पवारांनी बारामतीसाठी १०० कोटींचा निधी खेचला

हिंगणघाट पीडितेच्या उपचासाठी ५ लाख ४३ हजार ४४१ रुपये खर्च आला. ही सर्व रक्कम राज्य सरकारने रुग्णालयाला दिली आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधून रुग्णालयाला हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्य सरकारने मदत जाहीर करण्याआधी पीडितेच्या कुटुंबाने उपचारासाठी ६० हजार रुपये खर्च केले होते. ही रक्कमही पीडितेच्या कुटुंबाला राज्य सरकारने परत केली आहे. राज्य सरकारने ६० हजारांचा धनादेश पीडितेच्या वडिलांकडे सुपूर्द केला आहे. सोमवारी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी विभागाचे प्रमुख सदस्य सचिव डॉ. कमलेश सोनपुरे यांनी हिंगणघाट उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांकडे पीडितेच्या कुटुंबाला देण्यासाठीचा धनादेश दिला.

त्यानंतर लगेचच उपविभागीय महसूल कार्यालयाने हा धनादेश पीडितेच्या कुटुंबाच्या ताब्यात दिला. मुख्यमंत्र्यांनी हिंगणघाट पीडितेच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याची घोषणा केल्यानंतर रुग्णालयाकडून अपेक्षित खर्चाची आकडेवारी मागवण्यात आली होती. त्यावेळी रुग्णालयाने एकूण ११ लाख ९० हजार रुपये खर्च येईल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार राज्य शासनाने मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधून दोन टप्प्यांमध्ये निधी दिला. पहिल्या टप्प्यात चार लाख रुपये रुग्णालयाला देण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर झालेल्या एकूण खर्चाची उर्वरित रक्कम म्हणजेच १ लाख ४३ हजार ४४१ रुपये रुग्णालयाला दिले. पीडितेच्या उपचारासाठी राज्य शासनाने एकूण ५ लाख ४३ हजार ४४१ रुपये खर्च केला.


Web Title : CM followed the words given to the family of hinganghat victim

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Nagpur City, Mumbai City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)