या वर्षीचा नागभूषण पुरस्कार मुख्यमंत्र्यांना जाहीर

cm-fadnavis

नागपूर : नागभूषण फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा नागभूषण पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर करण्यात आला आहे. १ जानेवारी १०१७ रोजी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना प्रदान केला जाणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर तर विशेष अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. अजय संचेती, माजी खासदार दत्ता मेघे उपस्थित राहतील. हा पुरस्कार वितरण सोहळा १ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता राष्ट्रभाषा संकुलातील साई सभागृहात होणार असून एक लाख रुपये रोख व सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे.