छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अभिवादन

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शपथविधीनंतर प्रथमच मंत्रालयात आगमन झाल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार प्रतापराव- पाटील चिखलीकर, माजी मंत्री अनिल बोंडे, बबनराव लोणीकर, राहुल कुल, मुख्य सचिव अजोय महेता, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,प्रधान सचिव भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे सचिव नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, जलसंधारण व कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सचिव संजय चहांदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.