… म्हणून मुख्यमंत्र्याचं थकलेलं बिल मी स्वतः भरणार : जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad-CM Fadnavis

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘वर्षा’ बंगल्याला मुंबई महानगरपालिकेने दिवाळखोरीच्या यादीत टाकले आहे. बंगल्याचं साडेसात लाखांचं पाणी बिल थकल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे . माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महापालिकेकडून पाणी बिल थकबाकीदारांची माहिती मिळवली होती. त्याद्वारे ही सर्व माहिती उघडकीस आली आहे . यावरून राष्ट्रवादी काँग्रेचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला . आपण स्वत: मुख्यमंत्र्यांचं पाणी बिल भरणार असल्याचं सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांना आंघोळीला, तोंड धुण्यास उशीर होता कामा नये अन्यथा निर्णय प्रक्रियेत उशीर होईल असाही टोला आव्हाड यांनी यावेळी लगावला. विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

ही बातमी पण वाचा :- मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ बंगला दिवाळखोरीच्या यादीत; साडेसात लाखांचं पाणी बिल थकवलं 

‘मुख्यमंत्र्यांचं बिल कितीही असो. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, ते आम्हा सगळ्यांचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचं बिल मी स्वत: चेकने भरणार आहे. त्यांचं पाणी अजिबात कापता कामा नये. त्यांना आंघोळीला, तोंड धुण्यास उशीर होता कामा नये. त्यामुळे महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेत उशीर होईल आणि यामुळे महाराष्ट्राला मोठे नुकसान होईल ,अशा शब्दात आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला .

दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांची ८ कोटी रूपयांची पाणी बिलं थकली असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे . सर्वसामन्यांनी वीजेचे बिल थकल्यानंतर पाणी, वीज बंद करण्यात येते . मात्र मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना हा नियम लागू करण्यात का येत नाही ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे .