‘मुख्यमंत्री मिस्टर इंडियाचे गॅझेट घालून अदृश्य झाले’, भातखळकर यांची शेलक्या शब्दात टीका

मुंबई :- सध्या राज्यात कोरोना रूग्णांची आणि मृत्यूची संख्या दिवसागणिक वाढत आहे. तर दुसरीकडे राज्यातील आरोग्य यंत्रणा सुविधा पुरवण्यास असमर्थ ठरत आहेत. सोबतच आवश्यक औषधांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. देशातील आणि राज्यातील कोरोनाच्या स्थितीतवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. ‘मुखमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कुठंही दिसत नाहीत. सर्व निर्णय अजित पवारचं जाहीर करत असतात. सध्या खरे मुखमंत्री कोण आहेत?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

यावरून भाजपचे नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विट करत मुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकर यांना शेलक्या शब्दात टोला लगावला. ‘मुख्यमंत्री मिस्टर इंडियाचे गॅझेट घालून अदृश्य झाले आहेत. ते बहुधा कोरोना आटोपल्यावरच प्रकट होतील. अर्थात ही बाब प्रकाश आंबेडकरांच्या फार उशीरा लक्षात आल्याचे दिसत आहे, असं म्हणत भातखळकर यांनी मुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button