Video: रोगाला समुळ नष्ट करायचं असेल तर ऑपरेशन करणं गरजेचं – मुख्यमंत्री

CM Fadnavis

“मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी खास बातचीत”

‘महाराष्ट्र टुडे’ चे मुख्य संपादक यांच्याशी खास बातचीत करताना ,’स्वच्छ प्रतिमा आणि अभ्यासू नेते’ म्हणून ओळखले जाणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत, आपल्या देशात विकास करण्याच्या अनेक गोष्टी असताना सुद्धा आजपर्यंत आपला देश विकसित होऊ शकला नाही.’त्याच मुख्य कारण आहे, भ्रष्ठाचार आणि काळापैसा.

भ्रष्ठाचार आणि काळापैसा यावर मुख्यमंत्री म्हणालेत,’ रोगाला नष्ट करायचं असेल तर थेट त्याच ऑपरेशन करण गरजेचं आहे. जखम वाढत जाणार याची वाट पाहू नये, जख्मच्या आजूबाजू उपचारकारण्या पेक्षा थेट त्या रोगाच ऑपरेशन करावं. हेच मोदींनी ही केलं आहे.

‘नोटाबंदी नंतर तब्बल ११ लाख कोटी काळापैसा बँकेत जमा झालाय. त्या पैशाची गुंतवणूक , मोट्या कंपनी आणि पायाभूत सुविधानमध्ये करून रोजगाराच्या सुविधा उपलब्ध होणार. त्यामुळं लवकरच देशातील युवकांना चांगल्या रोजगाराच्या संधी मिळणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.