मुख्यमंत्री भाजपाचाच, आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री व्हावं – देवेंद्र फडणवीस

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षातील नेते प्रचाराला लागले आहेत . मागील काही दिवसांपासून राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार याला घेऊन भाजप आणि शिवसेनेत कलगीतुरा रंगला आहे .या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले . पुढील मुख्यमंत्री भाजपाचाच असणार असून शिवसेनेची इच्छा असेल तर आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपदी बसवू शकतात. पण हा निर्णय पूर्णपणे शिवसेनेचा असेल असं सांगितलं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते .

ही बातमी पण वाचा : राज्यात आघाडीचे केवळ २४ आमदारच निवडून येतील – मुख्यमंत्री

मी भाजपाचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचाही. हे युतीचं सरकार आहे,” असंही मुख्यमंत्री फडणवीस बोलले आहेत. आदित्य ठाकरे काय करणार किंवा त्यांना कोणतं पद दिलं जाईल हा शिवसेनेचा निर्णय असेल. जर उद्धव ठाकरेंनी सांगितलं तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होतील”. राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत मात्र कोणताच संभ्रम नाही. पुढचा मुख्यमंत्री कोण होणार हे सर्वांनाच माहिती आहे असं सांगत फडणवीसांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या वादावर स्पष्टीकरण दिले . तसेच शिवसेनेकडून आम्हाला कोणताही त्रास नाही, ते आमचे मित्र आहेत. मित्राकडून कधी आपल्याला त्रास होतो का?”, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून तरुण, तजेलदार चेहऱ्याची गरज आहे. जो तरुण महाराष्ट्राला, तरुणांना दिशा देऊ शकतो… महाराष्ट्रतील लोकही आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारतील, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त दोन महिन्यांपूर्वी व्यक्त केलं होतं.