परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

CM Uddhav Thackeray

मुंबई : विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा (UGC Final Year Exam) होणार की नाही याबाबतचा महत्त्वाचा निकाल सुप्रीम कोर्टाने आज दिला. परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र परीक्षा होणारच असं सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आपल्या निकालात म्हटले आहे. तसंच राज्य सरकार (State Government) परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाही असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाकरे सरकार अद्यापही ठाम असून, पुढील रणनीती आखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे तातडीची उच्चस्तरीय बैठक घेत आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ‘वर्षा’वर ही बैठक सुरु आहे. या बैठकीला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant), पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), राज्याचे मुख्य सचिव आणि सल्लागार उपस्थित आहेत. आता या बैठकीत मुख्यमंत्री कुठला निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER