
मुंबई : दिल्ली हिंसाचारावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांना सवाल करताना खासकरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी हल्लाबोल केला. दिल्लीत काल झालेल्या हिंसेवर भूमिका का घेतली नाही, असे विचारताना पवार आणि राऊतांचे तोंड शिवले होते का? असा सवाल शेलारांनी केला.
जेव्हा आदरणीय शरद पवारसाहेब काल फेसबुकवर लाईव्ह बोलत होते तेव्हा @ShelarAshish तुम्ही झोपले होते का?
गुड मॉर्निंग आशिष शेलार, झोपेतून उठा आणि ही लिंक चेक करा. https://t.co/MZHtVrRPGk pic.twitter.com/S5eRyQ4mYR— Clyde Crasto – क्लाईड क्रास्टो (@Clyde_Crasto) January 27, 2021
राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो (Clyde Krasto) यांनी ट्विट करून शेलारांच्या पत्रकार परिषदेला जशास तसे प्रत्युत्तर दिले. “जेव्हा शरद पवार काल फेसबुकवर लाईव्ह बोलत होते तेव्हा तुम्ही काय झोपले होते का? असा प्रतिसवाल क्रास्टो यांनी शेलारांना विचारला आहे.
गुड मॉर्निंग आशिष शेलार, झोपेतून उठा आणि ही लिंक चेक करा, असे म्हणत क्रास्टो यांनी पवारांनी मंगळवारी साधलेल्या संवादाची लिंक ट्विट करून शेलारांना जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला