कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगाळ वातावरण

Cloudy weather

मुंबई :  अरबी समुद्राच्या (Arabian Sea) वायव्य भागापासून ते उत्तर पंजाब आणि गुजरात दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच सौराष्ट्र, कच्छ आणि राजस्थानच्या नैऋत्य भागात चक्रीवादळासाठी वातावरण तयार झाले आहे. याचा परिणाम म्हणून मध्य महाराष्ट्रासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत  ढगाळ (Cloudy weather ) वातावरण तयार झाले आहे. ढगाळ हवामानामुळे मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. राज्यातील अनेक भागांत गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे.

तर कोल्हापूर आणि कोकणातील काही भागांत पाऊस पडत आहे. यामुळे आंब्यासह काजू पिकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या २४ तासांत कोल्हापूर, कोकण किनारपट्टी भागात अवकाळी पाऊस बरसला. रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक भागांत पाऊस झाला आहे. यामुळे किनारपट्टी भागात गारवा वाढला आहे. तसेच पुढील दोन दिवसांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

७ आणि ८ जानेवारी रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ६ जानेवारी दक्षिण कोकण, गोवा व महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह कडकडाट होण्याची शक्यता आहे. ७ जानेवारी दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER