
कोल्हापूर : ढगाळ हवामानामुळे कोल्हापूरची विमानसेवा कालपासून ठप्प झाली. इंडिगोचे हैदराबादवरून आलेले विमान लँडिंग होऊ शकले नाही.विमान लँडिंग न होता हैदराबादला परत गेले. नाईट लँडिंगची सुविधा नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काल सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण राहिले. सायंकाळी हे वातावरण अगदीच गडद ढगाळ झाले. त्यामुळे इंडिगोचे आलेले विमान परत गेले तर अलायन्स एअर कंपनीचे विमान आले नाही. नाईट लँडिंगची सुविधा नसल्याने आलेले विमान लँडिंग न होता परत गेले. याचा फटका प्रवाशांना सतत बसत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला