धार्मिक स्थळे बंद ठेवणे ही ठाकरे सरकारची विकृती- हर्षवर्धन पाटील

Harshvardhan Patil.jpg

अहमदनगर :- राज्य सरकारने अनलॉकची (Unlock) प्रक्रिया सुरू केली. मात्र राज्यात कोरोनाचा (Corona) शिरकाव झाल्यापासून मंदिरे बंद असल्याने हजारो कुटुंब संकटात सापडले आहे. एकीकडे राज्य सरकारने अनेक उद्योगधंदे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र धार्मिक स्थळ सुरू करण्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. यावरून माजी सहकार मंत्री व भाजपाचे (BJP) नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी राज्य सरकारवर जहरी टीका केली आहे.

राज्यातील धार्मिक स्थळे बंद ठेवणे, ही ठाकरे सरकारची विकृती आहे, अशी जहरी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली. माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या नगर येथील निवासस्थानी भेट दिली असता पाटील बोलत होते.

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की, मंदिरे बंद ठेवणे हा राज्यातील भाविकांवर अन्याय आहे. महाराष्ट्रातले लॉकडाऊन उठले असतानाही तीर्थक्षेत्रे व मंदिरे आद्यपही बंद आहेत. या सरकारने मंदिरांची दारे खुली करावीत. भजन व प्रवचनाला परवानगी द्यावी. मंदिरे उघडण्याचा निर्णय न घेतल्यामुळे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेले व्यवसाय सात महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे हजारो कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. तीन पक्षांच्या या सरकारमध्ये कुठलाही ताळमेळ दिसत नाही.

कोणाचेच कोणावर नियंत्रण राहिले नसल्याने सरकार वाचवण्यात सर्व मग्न आहेत. दिलीप गांधी यांच्यासारखे मतदारसंघाचा विकास करणारे व्यक्तिमत्व संसदेत पाहिजे होते, असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER