‘त्या’ 78 जागा एनडीए आणि युपीएला ठरू शकतात धोकादायक

NDA-UPA

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या 23 मे रोजी देशभरात घोषित होणार आहे. एक्झिट पोलनुसार देशात एनडीए बहुमताने जिंकून येणार अशी वातावरण निर्मिती केली आहे. परंतू देशात निवडणुकी दरम्यान संमिश्र वातावरण दिसून येत होते त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळेच त्या 78 जांबद्दलही विचार होणे गरजेचे आहे. कारण त्या 78 जागा कोणाकडे आपलं झूकतं माप ठेवणार यावरही देशात कोणाचं सरकार येणार हे ठरू शकतं, अस जाणकारांचं म्हणणं आहे.

इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया एक्झिट पोलच्या मतानुसार मतदानातील अंतर फक्त तीन चक्क्यांहून कमी असेल अशा एकूण 78 जागा आहेत धोकादायक ठरू शकतील. राखीव क्षेत्रातील या जागा एनडीए आणि युपीएसाठी धोकादायक ठरू शकतील अशी शक्य़ता वर्तवण्यात आली आहे.

सर्वेक्षणात असे म्हटले आहे की एनडीए आघाडीवर असलेल्या 37 जागा आहेत – यापैकी 33 जागा भाजपमध्ये आहेत. दुसरीकडे, तेथे 17 जागांवर यूपीए आघाडीवर आहे – यात 13 जागांवर काँग्रेसचा समावेश आहे.

प्रादेशिक पक्षांमध्ये 16 जागा आहेत, जिथे विजयाचा फरक फक्त तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे – या सातपैकी उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष-बहुजन समाज पार्टी- राष्ट्रीय लोकदल महागठबंधन, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, तीन मध्ये आंध्रप्रदेशात वायएसआर कॉंग्रेस पार्टीचा समावेश आहे आणि त्यात तेलंगानामधील तेलंगाना राष्ट्र समितीचादेखील समावेश आहे.
या जोरदार अटीतटीच्या स्पर्धेमध्ये कोणता पक्ष पराभूत होऊ शकतो कोणता पक्ष जिंकणार हे सांगणे कठीण आहे. तर, भाजपा हा विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र, तरीही भाजपच जिंकेल आणि देशात एनडीएच सरकार स्थापन होणार हे सध्यातरी सांगणे कठीण आहे. सध्या तरी एनडीए आणि युपीए दोन्ही पक्ष प्रादेशिक राखीव पक्षांच्या त्या 78 राखीव जागांवर यांचं भवितव्य अवलंबून राहणार आहे.