गडचिरोलीत नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक; १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान

Maharashtra Today

गडचिरोली : नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीत पुन्हा एकदा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे(Clashes between Naxals and police in Gadchiroli). या चकमकीत सी-६० पोलीस कमांडोनी १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पहाटे कोम्बिंग ऑपरेशनवर(Combing operation) निघालेल्या पोलीस पथकावर घात लावून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार केला होता. प्रत्युत्तरादाखल पोलीस विभागाकडून दोन तासापासून चकमक सुरु आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कोटमी जंगल परिसरातील छत्तीसगड सीमावर्ती भागात चकमक सुरु आहे. कोटरी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी मोठी सभा घेतल्याची गुप्त माहिती पोलीस विभागाला मिळाली होती. या माहितीद्वारे पहाटे सी-60 पोलीस पथकाने ऑपरेशन सुरु केले होते. पोलिसांनी आतापर्यंत जंगल परिसरातून ८ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button