‘पठाण’च्या सेटवर ज्युनियर आर्टिस्टने मोबाईलचा वापर केल्याने झाला गदारोळ

दोन वर्षानंतर शाहरुख खान (Shah Rukh Khan) पुन्हा एकदा सिनेमाचे शूटिंग करण्यासाठी कॅमेऱ्यासमोर उभा राहिला आहे. यशराज द्वारा निर्मित त्याच्या या सिनेमाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करीत आहे. मुंबईत या सिनेमाचे शूटिंग सुरु असून सेटवर मोबाईल कॅमेऱ्याने शूटिंग करण्यास बंद घातलेली आहे. सेटवर कोणालाही मोबाईल नेऊ दिला जात नाही. शाहरुख आणि अन्य कलाकारांचे लुक एवढ्यातच व्हायरल होऊ नयेत यासाठी सेटवर मोबाईल बॅन करण्यात आला आहे. परंतु बुधवारी सेटवर एका ज्युनियर आर्टिस्टने मोबाईलने शूटिंग केल्याने सेटवर चांगलीच खळबळ माजली होती. सिद्धार्थने (Siddhartha) या ज्युनियर आर्टिस्टला सहायकाल सेटवरून बाहेर काढण्याचे आदेशही दिले होते. परंतु सिद्धार्थने सांगूनही जूनियर आर्टिस्ट बाहेर न गेल्याने त्याला नंतर जबरदस्तीने सेटबाहेर काढल्याचे सांगितले जात आहे.

सेटवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेटवर काम करताना एका लाइटमॅनला थोडासा मार लागला. त्यामुळे सेटवरील अन्य कर्मचारी त्याची काळजी घेऊ लागले होेते. त्याचवेळी सेटवरील एका ज्युनियर आर्टिस्टने ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये शूट केली. सेटवरील ही घटना मित्रांना दाखवण्यासाठी तो त्याचे शूटिंग करीत होता. त्याला शूटिंग करताना दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने पाहिले आणि शूटिंग करू नको असे म्हटले. त्या ज्युनियर आर्टिस्टने तेव्हा सिद्धार्थचे ऐकले परंतु काही वेळाने पुन्हा त्याने गपचुप मोबाईलने शूटिंग करण्यास सुरुवात केली. सिद्धार्थ आनंदला हे सहन झाले नाही आणि त्याने त्या ज्युनियर आर्टिस्टला फोन त्याच्याकडे देऊन सेटच्या बाहेर जाण्यास सांगितले.

मात्र ज्युनियर आर्टिस्ट बाहेर जाण्यास तयार नव्हता आणि तो सिद्धार्थशी वादही घालू लागला होता. तेव्हा सेटवरील सुरक्षा रक्षकांनी त्याला सेटबाहेर नेले आणि तापलेले वातावरण थंड करण्याचा प्रयत्न केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER