
कोल्हापूर :- शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथील भाजी मार्केटमधील क्वारंटाईन सेंटरमधील चौघांमध्ये मंगळवारी रात्री उशिरा जोरदार हाणामारी झाली. संबंधितांनी मद्य प्राशन केल्याने ही घटना घडली असावी, अशीच चर्चा सर्वत्र आहे.
मलकापूर येथे मध्यवस्तीत असणाऱ्या नवीन भाजी मार्केट इमारतीत मुंबई, पुणे व अन्य जिल्ह्यातून आलेल्या पुरुषांना, तर सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीत महिलांना संस्थात्मक क्वारंटाईन केले आहे. गरपालिकेच्या स्वच्छता भागातील एक पुरुष कर्मचारीही येथे क्वारंटाईन आहे. रात्री उशिरा हा कर्मचारी आणि क्वारंटाईन असणारा येथील एक व्यापारी आणि त्यांची दोन मुले यांच्यात वाद होऊन जोरदार हाणामारी झाली.
सेंटर मध्यवस्तीतच असल्याने शिवीगाळ आणि मोठमोठ्या आवाजाने शेजारील नागरिक जमा झाले. पालिका प्रशासनाला नागरिकांनी याबाबत कळवले. तडजोडीने वाद तात्पुरता मिटला.
घडलेली घटना वाईट आहे. पालिका प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. प्रशासनाचा जबाबदारपणा याला कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला