अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात तू तू मैं मैं ; महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी ?

Bachchu Kadu and Ajit Pawar

मुंबई :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. निधीच्या मागणीवरुन दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाली. अमरावती विभागाच्या वार्षिक नियोजनाच्या बैठकीदरम्यान हा प्रकार घडला.

मी सरकारमध्ये असल्याने बोलू शकत नाही. मात्र विदर्भाचा अनुशेष भरुन काढला जावा, यासाठी आपण अधिक निधीची मागणी केली होती, मात्र निधी वाढून देण्यात आला नाही. परंतु निधी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, असं बच्चू कडू म्हणाले.

अमरावती विभागाच्या वार्षिक नियोजनाची बैठक सोमवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी अकोला जिल्ह्याला दिलेल्या निधीवर बच्चू कडू समाधानी नव्हते. परिणामी बच्चू कडू यांनी आक्रमक होत नाराजी व्यक्त केली.

नियोजन भवनात पार पडलेल्या बैठकीत विविध लोकप्रतिनिधींच्या मागण्या लक्षात घेऊन अमरावती जिल्ह्यासाठी 300 कोटींची तरतूद करण्यात आली. तसंच यवतमाळ 325 कोटी, बुलडाणा 295 कोटी, वाशिम 185 तर अकोला जिल्ह्यासाठी 185 कोटींचा निधी देण्यात आला.

अजित पवार यांच्या निधी वाटपावर बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती आहे. आपण अधिक निधीची मागणी करुनही कमी निधी मिळाल्याची भावना कडू यांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे विभागातील पाचही जिल्ह्यांना तरतुदीपेक्षा वाढीव निधी दिल्याचं अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ही बातमी पण वाचा : अजितदादांना लहानपणी सायकलवरून शाळेत नेणारे जालिंदर आजारी ; अजित पवारांनी क्षणात सगळी सुत्रे हलवली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER