शिवाजी विद्यापीठ : अधिसभेत गोंधळ, सभात्याग

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या आज बुधवारी झालेल्या अधिसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विद्यापीठ प्रशासनाने खोटी उत्तरे दिल्याने विद्यापीठ विकास आघाडी आणि सुटा संघटना यांनी सभात्याग केला. सभागृहाबाहेर पडून विद्यापीठाच्या प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली. घोषणा बाजी करीत विद्यापीठ प्रशासनाच्या गैरकारभाराचा निषेध केला. २३ प्रश्नापैकी तीन प्रश्नावर वादळी चर्चा झाली. अधिसभा सदस्य आणि विद्यापीठ प्रशासन यांच्यात खडाजंगी झाली. अधिसभा सदस्य एल. जी. जाधव यांनी खोटी माहिती दिली त्यावर स्थगन प्रस्ताव मांडला. कुलगुरू यांनी हा प्रस्ताव नामंजूर केला. त्यामुळे गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास तीनच प्रश्नावर संपला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER