राहुल गांधींचे एक विधान ठरले दुरावलेल्या महाविकास आघाडीतील सुसंवादाचा दुवा

राहुल गांधींच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाणांकडून स्पष्टीकरण

Prithviraj Chavan on statement of Rahul Gandhi

मुंबई : महाराष्ट्रात आमची सत्ता नाही. आम्ही महाराष्ट्रात कोणतेही मोठे निर्णय घेऊ शकत नाहीत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला काँग्रेसचा फक्त पाठिंबा आहे. एखादे सरकार चालवणे आणि सरकारला पाठिंबा देणे या दोन्हीमध्ये फरक असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केल्यानंतर राज्यात चर्चांना उधाण आले होते.

मात्र, त्यानंतर लगेच राज्यातील महाविकास आघाडीमध्ये हालचाली दिसून आल्या. सरकार स्थापना आणि मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर महाविकास आघाडीत अनेक वेळा जो असमन्वय दिसून येत होता. राहुल गाधींच्या एका विधानानंतर लगेच तिन्ही पक्ष एकत्र आलेले दिसले. आतापर्यंत राज्याच्या सत्तेत कॉंग्रेस दुरावलेली दिसत होती. राहुल यांच्या विधानानंतर मात्र, तिन्ही पक्षाच्या नेत्यांमधील दुरावा कमी करून एकसंधता, समन्वय घडवून आणावा लागला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

त्यामुळेच, कदाचित मधेमधे महाविकास आघाडी सराकरच्या विरोधात सूर काढणा-या पॉथ्वीराज चव्हाण यांनीही राहुल गांधींच्या त्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत महाविकास आघाडी एकसंध असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करत असावे असे म्हणण्याससुद्धा तितकाच वाव आहे.

राहुल गांधी यांच्या विधानावर स्पष्टीकरण देताना राहुल यांच्या विधानाचा विपर्यास केला गेेला असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

“राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. ही चर्चा भाजपाकडून मुद्दामहून घडत आहे. राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे,” असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.

दरम्यान महाविकास आघाडीसंदर्भात केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांनी बुधवारी फोनवरून संवाद साधला. तेव्हा राहुल गांधींनीही त्या विधानाचा फार बाऊ न करता काँग्रेस पूर्णत: महाविकास आघाडीच्या पाठीशी असून कोरोनाविरोधातील लढय़ात सरकारला सर्वप्रकारे सहाय्य केले जाईल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.

मात्र, या निमित्ताने का होईना राष्ट्रीय पक्ष कॉंग्रेसला दुर्लक्षित करून चालणार नाही असाही एक संदेश जातो. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि त्या सरकारमध्ये राष्ट्रीय पक्ष कॉंग्रेसचा सहभाग आहे हे मुख्यमंत्र्यांना विसरून चालणार नाही असाही एक संदेश राहुल गांधींनी महाराष्ट्र सरकारला देण्याचा प्रयत्न केला असावा का असाही प्रश्न या निमित्ताने अनेकांना पडला असावा.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER