सिटी को-ऑप. बँक घोटाळा : रवी राणा यांनी ईडीला दिली अडसुळांविरुद्धची कागदपत्रे

Ravi rana-Anandrao Adsul

मुंबई : सिटी को-ऑप. बँकेत (City Co-op Bank scam) झालेल्या घोटाळ्याशी शिवसेना नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा (Anandrao Adsul) संबंध आहे, असा आरोप करत याबाबतची  कागदपत्रे  बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा (Ravi rana) यांनी ईडीच्या कार्यालयाला सादर केली.

राणा यांनी स्वतः ही माहिती दिली. सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईत १३ – १४ शाखा आहेत. बँकेचे ९०० खातेदार आहेत. बेकायदा वाटलेल्या कर्जांमुळे बँक बुडाली. आनंदराव अडसुळांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्याने दिली. आता खातेदारांना केवळ एक  हजार काढता येते आहे. मराठी मतांवर राजकारण करणाऱ्यांनीच मराठी लोकांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप रवी राणांनी केला.

अडसूळ यांना वाचवण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर कारवाई करणार का ? असा सवाल रवी राणांनी विचारला आहे. सरकार आनंदराव अडसूळ यांना वाचवण्याचा प्रयत्न करते आहे. अडसूळ यांची केस दाबण्याचा प्रयत्न होतो आहे, असा आरोप रवी राणांनी केला. मात्र, ईडीकडून अडसूळ यांच्यावर कारवाई होईल, अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणालेत.

सोमय्या यांची पत्रपरिषद

दरम्यान, भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज सकाळीच पत्रकार परिषद घेऊन सिटी को-ऑप बँकेतील घोटाळ्यावरून आनंदराव अडसूळ यांच्यावर आरोप केले आहेत. ( Ravi Rana said Ed will take action against Anandrao Adsul in City Co-Op Bank Case) सिटी को-ऑप.  बँक घोटाळाप्रकरणी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

“बॅंकिंग क्षेत्रात जे खूप मोठ्या बाता करतात, त्यांच्याकडे पीएमसी बँकेचे पैसे पोहचले आहेत. काही महिन्यांपूर्वी सिटी बॅंकेचे गुंतवणूकदार आले होते, आनंदराव अडसूळ यांचा विषय पुढे लावून धरणार. पीएमसी बॅंक असो किंवा सिटी बॅंक, दोषींवर कारवाई होणार. ” असा इशारा सोमय्यांनी दिला. आनंदराव अडसुळांबद्दल आम्ही रिझर्व्ह बॅंकेला कळवणार आहोत, असे सोमय्या म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER