शहरात काही भागात नागरीकांनी लुटला सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद

सूर्यग्रहण

औरंगाबाद :- ५८ वर्षातील सर्वात मोठे सूर्यग्रहण पाहण्याचा योग वैज्ञानिक, खगोलशास्त्रज्ञ व अभ्यासकांना आज आला. परंतु ढगाळ वातावरणामुळे शहर व परीसरात आज अनेक ठिकाणी सूर्यग्रहण दिसण्यात अडथळा निर्माण झाला. आज सकाळी शहरात काही ठिकाणी दाेन ते तीन तास सूर्यग्रहण दिसले. बऱ्याच वर्षांनी आज सूर्यग्रहण पाहण्याचा याेग आल्याने शहरात अनेक ठिकाणी नागरीक विद्यार्थी डोळ्याला गॉगल लावून सूर्यग्रहण पाहण्यासाठी सकाळी जमले होते.

सूर्यग्रहणकाळात पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बंद

मात्र ढगाळ वातावरणामुळे अस्पष्ट सूर्यग्रहण दिसले. किलेअर्क भागातील शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापकांनी मात्र केवळ दोन सेकंदच सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद घेतला. तसेच सूर्यग्रहण पाहण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन शहरात काही ठिकाणी करण्यात आले होते. सकाळ पासून गाॅगल लावून बसलेल्या विद्यार्थ्यानं काही सेकंदच सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद मिळाला.