इतर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाला माहिती द्यावी : दत्तात्रय भरणे

Dattatraya Bharne

सोलापूर :- कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी परराज्य व इतर जिल्ह्यातून सोलापूर शहर व जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाला माहिती द्यावी. आवश्यक ती तपासणी करूनच आपल्या गावात व घरी प्रवेश करावा. आपल्या आजूबाजूला नवीन येणाऱ्या नागरिकांची माहितीदेखील ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाला द्यावी, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

पालकमंत्री भरणे म्हणाले, ­­‘कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी आता दक्ष राहणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळामध्ये परराज्यातून आणि इतर जिल्ह्यातून तसेच मुंबई, पुणे यासारख्या अनेक शहरातून अनेक नागरिक आपल्या शहरांमध्ये, ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात येत आहेत. या सर्व येणाऱ्या नागरिकांची प्रशासकीय नोंद होणे आवश्यक आहे. तपासणी करूनच गावांमध्ये, घरामध्ये प्रवेश करावा. अलगीकरण कक्षाची व्यवस्था स्थानिक प्रशासनाकडून व्हावी. गरज भासल्यास स्थानिक प्रशासनाने येणाऱ्या नागरिकांवर होम क्वारंन्टाइनचा शिक्का मारून त्यांना घरीच राहण्याच्या सूचना द्याव्यात’.

शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी दक्ष राहून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. आजूबाजूला येणाऱ्या नागरिकांची माहिती तात्काळ नागरिकांनी प्रशासनाला द्यावी. शासनाच्या सूचनांचे पालन सर्वांनी करावेत, असे आवाहनही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

Source : Mahasamvad

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला